प्रशांत भोपळे/हिवरखेड....
अकोला पोलीस दलाच्या हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडगाव बु. परिसरात पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई केली. ४० गोवंशांची कत्तल करून त्यांची कातडी विक्रीसाठी वाहून नेणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून वाहन आणि मोबाईलसह एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिनांक ९ मे २०२६ रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोहेकॉ प्रमोद चव्हाण आणि त्यांचे पथक मालठाणा बु. ते अडगाव बु. रोडवर अमोल ढोकणे यांच्या शेताजवळ आकस्मिक नाकाबंदी करत होते. दुपारी ४:१० वाजेच्या सुमारास संशयास्पद रित्या येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला (क्र. MH 30 AB 2482) पोलिसांनी थांबवून तपासणी केली.तपासणी दरम्यान वाहनामध्ये तब्बल ४० गोवंशांची कातडी मिळून आली. ही कातडी गोवंशाची कत्तल करून विक्रीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ वाहनचालक अब्दुल खाँ महेबुब खाँ (वय ५० वर्षे, रा. शिवाजी नगर, अडगाव बु., ता. तेल्हारा) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी पंचसमक्ष खालील मुद्देमाल जप्त केला आहे:१. ४० गोवंशांची कातडी: अंदाजे किंमत ४०,००० रुपये.२. एम. मोबाईल: अंदाजे किंमत १०,००० रुपये.३. चारचाकी वाहन (MH 30 AB 2482): अंदाजे किंमत २,००,००० रुपये.एकूण मुद्देमाल: २,५०,००० रुपये.याप्रकरणी पोहेकॉ योगेश इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल खाँ विरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३२५ आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(क), ९, ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ योगेश इंगळे करत आहेत.
