संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून प्रा. सचिन नारायण जोशी यांना संगणक शास्त्र विषयात PhD (आचार्य पदवी)..


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून प्रा. सचिन नारायण जोशी यांना संगणक शास्त्र विषयात PhD (आचार्य पदवी)..

अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभागातून प्रा. सचिन नारायण जोशी (रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) यांनी "Designing of An Efficient Approach Using Web Content Mining Based Recommender System for Agriculture Domain"** या विषयावर संशोधन करून यशस्वीरित्या आचार्य (PhD) पदवी प्राप्त केली आहे.या संशोधनात प्रा. जोशी यांनी कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी वेब कंटेंट मायनिंगवर आधारित कार्यक्षम शिफारस प्रणाली (Recommender System) विकसित करण्यावर मुख्य भर दिला. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन तीन महत्त्वाचे मॉड्यूल्स तयार केले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे योग्य आणि उपयुक्त माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.संशोधन कालावधीत प्रा. सचिन जोशी यांनी एकूण ८ संशोधनपत्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातनाम जर्नल्समध्ये प्रकाशित केली. यापैकी पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय IEEE परिषदेत त्यांना"Best Paper Award" ने गौरवण्यात आले. कृषी मार्केट संदर्भात 1 डेटासेट तसेच, फोरकास्टिंगसाठी विकसित केलेल्या अल्गोरिदमचे पेटंट ही प्रकाशित झाले आहे.या संशोधनाचे मार्गदर्शन विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागाचे डॉ. अविनाश बा. मनवर यांनी केले. निकाल जाहीर झाल्यानंतर संशोधन केंद्रप्रमुख व विभागप्रमुख डॉ. मोहम्मद अतीक, परीक्षक तथा इंद्रप्रस्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष ससनकर (अध्यक्ष, भारतीय तांत्रिकी संशोधन व विकास परिषद) यांच्यासह विभागातील सर्व प्राध्यापकांनी प्रा. सचिन जोशी यांचे अभिनंदन केले.प्रा. सचिन नारायण जोशी यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिल, संपूर्ण परिवार, मार्गदर्शक डॉ. अविनाश मनवर, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना दिले आहे.सर्व स्तरातून प्रा. जोशी यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कृषी क्षेत्रातील डेटा मायनिंग आणि रेकमेंडर सिस्टमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्यात मोठी मदत होईल, असे मानले जात आहे.

Previous Post Next Post