जळगाव जामोद (प्रतिनिधी):
पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने कृष्णाई गोशाळा ट्रस्ट, जामोद यांच्या वतीने "पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा"चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, 10 मे 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता कृष्णाई गोशाळा ट्रस्ट, जामोद येथे आयोजित करण्यात आली आहे.प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून नितीन मालवे, अंकित काळे, कविताताई ताकोते, सत्यकलाताई कुबेरे देवलापार नागपूर येथील उपस्थित राहतील.कार्यशाळेत सहभागींना साचा (Mould) च्या साहाय्याने शेणापासून म्हणजेच गोमयापासून 100% नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष शिकवण्यात येणार आहे. पारंपारिक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पर्याय म्हणून गोमयापासून तयार केलेल्या मूर्ती जलद विघटनशील आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत.
कार्यशाळेतून सहभागींना पुढील गोष्टी शिकायला मिळणार आहेत:
1. साचा वापरून सुंदर आणि टिकाऊ गणेश मूर्ती बनवण्याची तंत्रशुद्ध प्रक्रिया
2. कमी वेळ आणि कमी खर्चात उत्पादन करून लघुउद्योग कसा सुरू करावा
3. तयार मूर्तींची विक्री, मार्केटिंग आणि ऑर्डर घेण्यासाठी मार्गदर्शन
4. व्यवसाय सुरू करण्यासाठी सतत तांत्रिक आणि व्यावसायिक सपोर्ट
कृष्णाई गोशाळा ट्रस्टचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल यांनी सांगितले की, "गोमयापासून मूर्ती बनवणे ही आपली पारंपारिक कला आहे. यामुळे एकीकडे पर्यावरणाचे रक्षण होईल, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होईल."ही कार्यशाळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खुली असून सहभाग विनामूल्य आहे. "शिका, बनवा आणि कमवा" या ब्रीदवाक्यासह ही कार्यशाळा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या चळवळीला बळ देणारी ठरणार आहे.या कार्यशाळेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याच्या आव्हान संस्थेचे कार्य सचिव सुनिल ढगे यांनी केलं.नोंदणीसाठी संपर्क:9011919575, 9860562929, 97674 53186
