जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुरज जाधव यांची मुख्याधिकारी श्रेणी ‘अ’ पदी पदोन्नती झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.डॉ. जाधव हे तत्पर निर्णयक्षमता, प्रभावी प्रशासन आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची त्यांची शैली विशेष प्रशंसनीय मानली जाते. विशेषतः गोरगरीब व गरजू नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.जळगाव जामोद शहरातील नगरपरिषद हद्दीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये डॉ. जाधव यांच्याबद्दल आदराची भावना असून, त्यांच्या पदोन्नतीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख व विकासाभिमुख कामकाज अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.डॉ. सुरज जाधव यांना मुख्याधिकारी श्रेणी ‘अ’ पदी पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
