सागर झनके यांना कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर...


 सागर झनके यांना कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.संकल्प बहुद्देशीय संस्था यांचे विद्यमाने कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शेगांव मध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, संस्था, प्रशासकीय, कला, पत्रकार, पोलीस, वकील सरपंच व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना हा कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थिती मध्ये हा पुरस्कार सोहळा 12 जुलै रविवारी शेगांव येथे पार पडणार आहे अशी माहिती कार्यक्रम मुख्य आयोजक प्रतीक्षा वासनिक यांनी दिली आहे.

Previous Post Next Post