सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट सोशल मीडिया आणि सार्वजनिक माध्यमांवर पैगंबर हजरत मोहम्मद साहब यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाझिया खान (नाझिया इलाही) यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीन (AIMIM) अकोट शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात अकोट शहर पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रमुखांमार्फत मा. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप AIMIM चे अकोट शहर अध्यक्ष आरिफ शाह हन्नान शाह, यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे कि, नाझिया खान यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे भारतातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ आणि तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीनिवेदनात पुढे नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा आणि शांतता भंग पाडू शकते. तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळेतच रोखणे अत्यंत आवश्यक आहे. तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणीया प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महिलेविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अन्सार मामू अकोट तालुका अध्यक्ष, अन्वर मिर्झा शहर उपाध्यक्ष, अकरम अली युथ उपाध्यक्ष,अशी नम्र विनंती अकोट शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे. भविष्यात कोणीही अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा समाजात द्वेष व अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
