जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा.. उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवा.. नगराध्यक्ष गणेश दांडगे.


जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा.. उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवा.. नगराध्यक्ष गणेश दांडगे.

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जागतिक सायकल दिनानिमित्त जळगाव शहरात सायकलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जळगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून सायकल संस्कृती रुजविण्याचे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.यावर्षी जागतिक सायकल दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे नगराध्यक्ष गणेश दांडगे यांनी स्वतः सायकल चालवत या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करण्याचे, नियमित व्यायाम करण्याचे आणि सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.सायकलिंगमुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठीही मोठे योगदान मिळते. याच संदेशाला बळ देत जळगाव शहरातील सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्साहाने सायकल रॅलीत सहभाग घेत जागतिक सायकल दिन साजरा केला.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सायकलिंगबाबत जागरूकता निर्माण होऊन पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Previous Post Next Post