जळगाव जामोद(प्रतिनिधी):
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नीत स्वातंत्रविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव (जामोद) येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनींनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सावरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव अंतर्गत योग दिन उत्साहात व शिस्तबद्ध पध्दतीने साजरा केला. या योग शिबिरात शाळेतील शिक्षक वृंद व इतर उपस्थित होते , प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच अजय शेगोकार यांनी विद्यार्थ्याना योगविषयक मार्गदर्शन केले व सरांनी सूर्यनमस्कार शिकविले. त्यांनंतर स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने करून दाखविले व योगासनांचे लाभ पटवून दिले. विद्यार्थीनींनी शाळेच्या विद्यार्थ्यांना प्राणायम, कपालभाती वृक्षासन, वज्रासन , अनुलोम विलोम त्सारखे विविध आसने करून दाखविली.विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व सांगितले. नियमित योग आणि सेंद्रिय आहाराचा दैनंदिन जीवनातील वापर आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो, असा संदेश त्यांनी दिला. सावरगाव परिसरातील तरुण आणि शाळकरी मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिबिराच्या शेवटी, सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग समाविष्ट करण्याचा आणि निरोगी जीवनशैली जगण्याचा संकल्प केला. विद्यार्थांनी हे शिबीर उद्यानविद्या महाविद्यालयातील प्राचार्य योगेश गवई सर, उपप्राचार्य सतिश धर्माड ,कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे सर, आणि विषयतज्ञ जिव्हेश साळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. विद्यार्थी तृषांक घाटे, आदित्य पवार, सोहम राऊत , गौरव घनोकार , मोहित चुनाडे यांनी पार पाडले. योग हे आरोग्यदायी जिवामृत असून योगामुळे शरीर प्रबळ व निरोगी बनते है विद्यार्थ्यांना पटवून देणे व योगासने दैनंदीन जिवनात अवलंबण्याचे आव्हाहन करने हा या शिबीराचा मुख्य उद्देश होता.
