जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत 18 जुलैला सिंदखेड राजा येथे होणार जनता दरबार ...!


 जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पॉट निपटारा करण्यासाठी  केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत 18 जुलैला सिंदखेड राजा येथे होणार जनता दरबार ...!

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींच्या समस्यांच्या, तात्काळ निपटारा करण्यासाठी येत्या 18 जुलै रोजी सिंदखेड राजा येथे जनता दरबाराचे आयोजन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले आहे. नागरीकांनी आपल्या तक्रारी देऊळगांव राजा व सिंदखेड राजा येथे स्थापन करण्यात  आलेले विशेष जनता दरबार  तक्रार कक्षेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींचा , समस्यांच्या ऑन दि स्पॉट निपटारा करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व प्रशासकिय अधिकारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हातील सातही विधानसभा मतदार संघ निहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या जनता दरबार कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भुमितुन करण्यात येणार आहे.

सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचा पहिला जनता दरबार येत्या 18 जुलै रोजी सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारामध्ये सिंदखेड राजा मतदार संघातील जनतेच्या तक्रारी, समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी समस्या तक्रारी लेखी स्वरुपात संबंधित तहसिल कार्यालयात 17 जुलै पर्यंत सादर कराव्यात सिंदखेड राजा आणि देऊळगांव राजा तहसिल कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी विशेष जनता दरबार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयातील  श्रीमती ज्योती बारवाल भ्रमणध्वनी क्रं-7276093269 आणि मनोज देशमुख भ्रमणध्वनी क्रं-9823197001 आणि देऊळगांव राजा तहसील  कार्यालयात  सहाय्यक महसुल अधिकारी दिपक मोरे, भ्रमणध्वनी क्रमांक 9850814038  बालाजी कौशल्य  भ्रमणध्वनी क्रमांक 9764619420 यांच्याकडे  17 जुलैच्या सांयकाळी 5:00 वाजेपर्यंत सादर कराव्यात. 17 जुलैपर्यंतच प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा समावेश 18 जुलैला होणाऱ्या जनता दरबारामध्ये  निपटारा करण्यासाठी होणार आहे. तरी सर्वांनी आपल्या तक्रारी तात्काळ संबंधित तहसील कार्यालयातील जनता दरबार विशेष कक्षात सादर कराव्यात असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post