अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी हिवरखेड
येथील स्थानिक एस बी आय शाखेच्या वतीने आकस्मिक निधन झालेल्या ग्राहकांच्या नातेवाईकाला ७ जुलै रोजी २ लाखाचे विम्याचे कवच देण्यात आले, हा विमा पंतप्रधान जीवन ज्योत योजने अंतर्गत देण्यात आला, या शाखेचे ग्राहक स्व सुरेश मनोहर बांगर यांनी यांचा वारसा यांचे भाऊ याच्या सहकार्याने स्टेट बँक मध्ये ४३६ रुपयांचा विमा काढला, काही कालावधी नंतर त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला, त्यांचा वारसा असलेले त्यांचे भाऊ यांनी ही बाब त्यावेळी असलेले शाखा अधिकारी मनोज चव्हाण यांच्या निदर्शनात आणून दिली शाखा अधिकारी यांनी कागदांची पूर्तता करून पंतप्रधान जीवन ज्योत विम्या अंतर्गत पूर्तता केली, व दिनांक ७ जुलै रोजी मूर्तकाचा वारसा महेंद्र मनोहर बांगर यांना २ लाखाचे अर्थसाह्य देण्यात आले, यावेळी शाखेचे नवयुक्त अधिकारी राजकुमार कापगते,, बँकेचे सर्व कर्मचारी पत्रकार अर्जुन खिरोडकार व काही ग्राहक उपस्थित होते, ग्राहकांनी या विम्याचा लाभ घ्यावा, हा विमा काढून वार्षिक फक्त ४३६ रुपये भरावे आपल्या वारसाला याचा लाभ मिळेल असे आव्हान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिवरखेडच्या वतीने करण्यात आले.
