अकोला हिवरखेड या बस फेरीत वाढ करा,प्रवाशी व पत्रकार वर्गाची मागणी...


 अकोला हिवरखेड या बस फेरीत वाढ करा,प्रवाशी व पत्रकार वर्गाची मागणी...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथे नव्याने २९ जून रोजी पत्रकार बांधवांच्या व नगरपरिषदच्या आरोग्य सभापती यांच्या मागणी वरून तेल्हारा आगार एस टी बसस्थानक यांनी हिवरखेड ते थेट अकोला एस बस सुरू केली , ही बस सुरू झाल्याने अनेक प्रवासी व विद्यार्थी व्यापारी यांना सोयीचे झाले, हिवरखेड अकोट या मार्गाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना या मार्गाने विलंब होतो, बऱ्याच प्रवाशांच्या हाताशी रेल्वे सापडत नाही , त्यामुळेच ही एस टी बस तेल्हारा मार्गे सुरू करण्यात आली,  परंतु या मध्ये आणखी प्रवाशांची मागणी वाढली,अकोला ते हिवरखेड या बस फेरीत वाढ करा, संध्याकाळी ६ किंवा दुपारी ५ या नुसार थेट अकोला ते हिवरखेड या एस टी बस फेरीत वाढ करा, तसेच हिवरखेड ते अकोला फलक सुद्धा लावावे, अशी मागणी पत्रकार गणेश अग्रवाल,संदीप इंगळे, धीरज बजाज, राहुल गिऱ्हे,जितेश कारिया, सूरज चौबे, गणेश सुरजोसे,  गजानन राठोड, जावेद खान, उमर बेग, शहजाद खान, प्रदीप पाटील, अर्जुन खिरोडकार, यांच्यासह नगरपरिषदच्या आरोग्य सभापती सौ वंदना राजेश वानखडे यांची मागणी जोर धरत आहे,

Previous Post Next Post