​श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात 'सायबर सुरक्षा व महिला जनजागृती' कार्यक्रमाचे आयोजन...


 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात 'सायबर सुरक्षा व महिला जनजागृती' कार्यक्रमाचे आयोजन...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथे अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि सायबर सुरक्षा जागृती व उपाय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, दि. १६ जुलै २०२६ रोजी विद्यार्थीनी व महिलांसाठी विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन बागुल आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत उपस्थित होते.मार्गदर्शन करताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन बागुल यांनी सोशल मीडियावरील वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थीनींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची नियमावली पाळण्याचे आवाहन केले त्यामध्ये ​अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.​पासवर्ड, ओटीपी (OTP) किंवा बँक डिटेल्स कोणालाही शेअर करू नका.​फेक प्रोफाइल, अश्लील मेसेज किंवा धमकी मिळाल्यास त्वरित संबंधित सोशल प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा.​सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो व खाजगी माहिती शेअर करताना विशेष काळजी घ्या.​यावेळी ठाणेदार सचिन बागुल यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास घाबरून न जाता कायदेशीर पावले उचलण्याचे आवाहन केले. कोणतीही ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करून तक्रार नोंदवावी, हा क्रमांक २४x७ उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. गिरीश मायी म्हणाले की, "आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे ज्ञान असणे काळाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयात असे कार्यक्रम नियमितपणे राबवले जातील. विद्यार्थीनींनी सायबर गुन्ह्याबाबत घाबरून न जाता प्रसंगी त्वरित तक्रार करावी.​कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रा. जी. व्ही. कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सचिव प्राध्यापिका नीलिमा भोपळे, प्रा. गणेश जोशी, प्रा. विनोद बावस्कार, प्रा. रामेश्वर सायखेडे, प्रा. सचिन उलटकार आणि कर्मचारी गजानन वानखेडे, समाधान नीलजे, बाबुराव चव्हाण, हर्षद धर्मे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सत्राला महाविद्यालयातील दीडशे विद्यार्थीनींनी उपस्थित राहून सायबर सुरक्षेचे धडे गिरवले.

Previous Post Next Post