वानखेडच्या बालाजी मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा; दोन आरोपी गजाआड, मुद्देमाल हस्तगत..!


 वानखेडच्या बालाजी मंदिरातील चोरीचा २४ तासांत छडा; दोन आरोपी गजाआड, मुद्देमाल हस्तगत..!

​बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरामध्ये झालेली चोरीची घटना तामगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.​दिनांक १५ जुलै २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून रामदेव बाबा मूर्तीचे चांदीचे साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी फिर्यादी रतनलाल सुखदेव चांडक (वय ७५, रा. वानखेड) यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०५(ड) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरट्यांनी लंपास केलेल्यांमध्ये चांदीच्या पादुका: ४०० ग्रॅम,​चांदीचे छत्र: १०० ग्रॅम,​चांदीचा घोडा: ५० ग्रॅम,​एकूण वजन: ५५० ग्रॅम चांदी (अंदाजे किंमत १,२५,००० रुपये) चा मुद्देमाल चोरून नेला होता.​गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे वानखेड येथील रहिवासी १. अमोल कमलाकर छळकर आणि २. गजानन सुरेश सोळंके या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्यापुढे त्यांनी चोरीची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे.​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे (मलकापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पोहेका उमेश बोरसे, संतोष डाखोरकर, चालक पोहेका संतोष आखरे, सुनील वावगे आणि पोका प्रमोद मिरे यांच्या पथकाने पार पाडली.

Previous Post Next Post