सैय्यद शेकील/अकोट तालुका प्रतिनिधी...
तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी गावातील पाच गावांना जोडणारा आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्यांची दुराव्यस्था झाली होती.व ठिकठिकाणी सांडपाण्याचे मोठे डबके साचले होते.नाल्यांच्या दुरवस्थेमुळे घाण पाणी नालीत न जाता थेट रस्त्यावरून वाहत होते.या साचलेल्या पाण्यामुळे डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया,डेंग्यूसारख्या आजारांची भीती निर्माण झाली होती.हा मुख्य मार्ग असल्याने शिवपूर,राहणापूर,कासोद,रामापूर व धारूर या पाच गावांना जोडणारा आहे.या सांडपाण्यामुळे,व रोगराईमुळे वॉर्ड नंबर १ मधील नागरिक त्रस्त झाले होते.येथे दिवसभर टू व्हीलर, फोर व्हीलर,गाड्यांची मोठी रहदारी सुरू असते..परिसरात उर्दू शाळा,अंगणवाडी,सरकारी दवाखाना,मशीद,पोस्ट ऑफिस व ऑटो स्टैंड असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना याच घाणीतून ये-जा करावी लागत होती.अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे,अंत्ययात्राही याच पाण्यातून न्यावी लागत होती.या बाबत वॉर्ड क्रमांक १ लेंडीपुरा आणि बाजार परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी,व लेखी तक्रारी सुध्दा केल्या होत्या.व येत्या आठ दिवसांत नाल्यांची दुरुस्ती न झाल्यास साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बसून अक्षय मोकासे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.याची ग्राम पंचायत प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन नाल्यांची माती,गोटे,गाळ,काढून साफसफाई सुरू केली आहे.व येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण गावात कीटक नाशकाची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम पंचायतचे नवनिर्वाचित सचिव डाबेराव यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया
आठवडी बाजार ते नागास्वामी मंदिर हा मुख्य रस्ता सांडपाण्यामुळे डबके बनला होता.मच्छर आणि जीवजंतू वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता.ग्रामपंचायतने ताबडतोब दखल घेऊन सांडपाण्याची विल्हेवाट लावावी व नाल्यांची दुरुस्ती करावी.अन्यथा आम्ही याच पाण्याच्या डबक्यात बसून तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता.याची ग्राम पंचायतने दखल घेतली व नाल्यांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.
अक्षय मोकासे नागरिक बोर्डी
प्रतिक्रिया
आठवडी बाजारात उर्दू शाळा,अंगणवाडी,मशीद,पोस्ट ऑफिस, सरकारी दवाखाना आणि ऑटो स्टैंड असल्यामुळे येथे दिवसभर नागरिकांची व वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू राहते.रस्त्यावरील सांडपाण्यामुळे आणि चिखलामुळे शाळेतील लहान मुले-मुली,रुग्ण आणि ग्रामस्थ पूर्णपणे वैतागले होते.यावर ग्राम पंचायतने त्वरित दखल घेतली.व साफसफाईला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रमेश पाटील खिरकर नागरिक बोर्डी
प्रतिक्रिया
आठवडी बाजारातिल नाल्यांची माती,गोटे, गाळ काढून साफसफाई सुरू केली आहे.येत्या दोन,तीन दिवसात गावात कीटकनाशकाची फवारणी करण्यात येईल.
जी.एस.डाबेराव सचिव बोर्डी.
