चिखलात खेळूया निसर्गाशी नाते जोडूया, सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे संपन्न...


 चिखलात खेळूया निसर्गाशी नाते जोडूया, सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी;

मोबाईलची स्क्रीन सोडून मातीच्या रंगात रंगू या.महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जळगांव जामोद केंद्रातर्फे ,सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे "International Mud Day" साजरा करण्यात आला. केंद्राच्या अध्यक्षा, शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ.स्वातीताई केला यांच्या तसेच केंद्राचे सल्लागार व शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता.मुलांनी मनसोक्त चिखलाचा आनंद लुटला आणि विविध वस्तू तयार केल्या. चिखलांपासून विविध वस्तू बनवल्याने मुलांच्या कल्पकतेला आणि कौशल्यांना वाव मिळतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा देशमुख मॅडम यांनी केले. यामध्ये त्यांनी International Mud Day  हा दिवस दरवर्षी 29 जून रोजी जगभरात साजरा केला जातो तसेच हा दिवस लहान मुलांना मोबाईल टीव्ही आणि स्क्रीन पासून दूर नेऊन थेट निसर्गाशी आणि मातीशी जोडण्यासाठी साजरा केला जातो याचे महत्त्व सांगितले. 

या दिवसाची सुरुवात 2009 मध्ये वर्ल्ड फोरम फाउंडेशनच्या एका परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या गिलियन मेक आणि नेपाळच्या विष्णू भट्टा यांच्यात चर्चा झाली आणि नेपाळमधील अनाथ मुलांना ऑस्ट्रेलियाच्या मुलांनी पैसे गोळा करून मदत केली आणि दोन्ही देशातील मुले एकत्र चिखलात खेळली. "Equality through play"हा संदेश यातून देण्यात आला. लहान मुलांना चिखलात निसर्गाच्या सानिध्यात आणणे त्यांच्यातील सर्जनशीलता वाढवणे तसेच मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. मातीमध्ये Mycobacterium vaccae नावाचे  जिवाणू असतात जे मानवी शरीरात आनंदी संप्रेरके तयार करतात. केंद्राचे उपाध्यक्ष व शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे सर, केंद्राचे कोषाध्यक्ष राजेश लोहिया सर, व केंद्राच्या सचिवअरुणा व्यवहारे मॅडम आणि शाळेच्या पर्यवेक्षिका म्हसाळ मॅडम तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासह पालक प्रामुख्याने उपस्थित होते.बालाकांचे मातीशी नाते जोडण्याचा हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे.

Previous Post Next Post