संविधान कॉलनीत भव्य वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न; नागरिकांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ...शासनाच्या १ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत उपक्रम; बांधकाम सभापती सुशील पुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम...


 संविधान कॉलनीत भव्य वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न; नागरिकांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ...शासनाच्या १ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत उपक्रम; बांधकाम सभापती सुशील पुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम...

सैय्यद शेकील/अकोट प्रतिनिधी....

अकोट पर्यावरण संरक्षण आणि हरित अकोटचे स्वप्न साकार करण्यासाठी अकोट शहरातील स्थानिक लोहारी रोडवरील संविधान कॉलनी येथे आज भव्य वृक्षारोपण वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हा कार्यक्रम शासनाने हाती घेतलेल्या 'एक कोटी वृक्ष लागवड' अभियानांतर्गत तसेच बांधकाम सभापती तथा नगरसेवक सुशील पुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी "लावलेला प्रत्येक वृक्ष जगवू, त्याचे संगोपन करू" अशी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.आयोजकांनी सांगितले की, केवळ वृक्षारोपण नव्हे तर त्याचे संगोपन करणे हेच खरे पर्यावरण रक्षण आहे. यासाठी संविधान कॉलनीमध्ये असे नाविन्यपूर्ण उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस ठाणेदार किशोर जुनघरे, बांधकाम सभापती तथा नगरसेवक सुशील पुंडकर, बसंतराव तेलगोटे, साहेबराव जंजाळ, देविदास वानखडे, राजू राऊत, विशाल तेलगोटे, अनिकेत तेलगोटे, नरेश ओंईबे, निलेश ओंईबे, भीमराव वानखडे, गौतमा फाऊंडेशनचे अध्यक्ष धम्मपाल सपकाळ, विनोद तेलगोटे, अन्नपूर्णा पडसपगार, राजकन्या ओंईबे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवक योगेश लबडे यांनी केले. त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत नागरिकांना वृक्षप्रेमी होण्याचे आवाहन केले. 

वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी परिसरात पाणी देण्याची आणि कुंपण घालण्याची जबाबदारीही स्वीकारली. कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा वृक्ष संवर्धनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.बांधकाम सभापती सुशील पुंडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमातून समाजाला काहीतरी देणे महत्त्वाचे आहे. एक कोटी वृक्ष अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे."संविधान कॉलनीतील या उपक्रमामुळे परिसरात हरित क्रांतीला चालना मिळेल आणि इतर कॉलन्यांसाठी हा आदर्श ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post