बापुमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी करिअर संसद शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न...


 बापुमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी करिअर संसद शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न...

जळगाव जामोद (प्रतिनिधी)

पिंपळगाव काळे येथील बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीमजी पटेल, सहसचिव श्री. रब्बानीजी देशमुख तसेच प्राचार्य डॉ. शत्रुघ्नजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  करिअर कट्टा अंतर्गत जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त करिअर संसद शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये  उपप्राचार्य डॉ. फराह शेख, उपप्राचार्य डॉ. चेतन पलन, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. महेश नेतनस्कर, करिअर कट्टा तालुका समन्वयक प्रा. एन. जी. आसोले, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात करिअर संसदेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली तसेच बिल्ला दैनंदिनी व नियुक्ती प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कु. प्रगती इंगळे, नियोजन मंत्री म्हणून कु. प्रगती गायकवाड, कायदे व शिस्तपालन मंत्री म्हणून चि. पियुष हिरळकर, सामान्य प्रशासन मंत्री म्हणून कु. साक्षी बावस्कार, माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कु. पायल तायडे, उद्योजकता विकास मंत्री म्हणून कु. अर्चना गरुड, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री म्हणून चि. चैतन्य सारोकार, कौशल्य विकास मंत्री म्हणून चि. दिपक जाधव, संसदीय कामकाज मंत्री म्हणून चि. प्रतिक शेळके, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून कु. नेहा भोपळे तसेच सदस्य म्हणून चि. वैभव झाल्टे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या माजी करिअर संसद मुख्यमंत्री तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य कु. सानिया पटेल या विद्यार्थिनीने करिअर कट्टामुळे स्वतःमध्ये घडलेला सकारात्मक बदल, नेतृत्व विकास, विविध स्तरांवर मिळालेल्या संधी तसेच विद्यार्थी दशेतील अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडले. या प्रेरणादायी अनुभवामुळे विद्यार्थ्यांना करिअर कट्टामध्ये सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी प्राचार्य डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मोठी स्वप्ने पाहा, ती पूर्ण करण्याचा दृढ संकल्प करा आणि करिअर कट्टा या प्रभावी उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्या. करिअर कट्टा हा केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि करिअर घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने या उपक्रमातील प्रत्येक संधीचा लाभ घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे."कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक डॉ.प्राजक्ता बाठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन करिअर कट्टा तालुका समन्वयक प्रा. नितीन आसोले यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही करिअर कट्टाच्या माध्यमातून आपल्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प याच कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त केला.

Previous Post Next Post