पोपटखेडच्या धरणावरून जाणाऱ्या खिरकुंड रुधाडी पुलावरून अवैध वाहतूक बंद करा..न्यू एकता चालक मालक युनियन च्या वतीने पीडब्ल्यूडी ला दिली सूचना...


 पोपटखेडच्या धरणावरून जाणाऱ्या खिरकुंड रुधाडी पुलावरून अवैध वाहतूक बंद करा..न्यू एकता चालक मालक युनियन च्या वतीने पीडब्ल्यूडी ला दिली सूचना...

सैयद शैकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये अकोला जिल्ह्याचे पर्यटन स्थळ मानलेलं पोपटखेड धरण या धरणाला आदिवासी बंधूंची शेती व गाव जोडणी रस्ता आहे त्याकरिता धरणा मध्ये सूर्यायेणारी नदी खूप मोठी आहे त्या नदीवरून इंग्रज कालीन पूल बांधलेला आहे त्या पुलाची क्षमता केवळ आठ टनाची आहे. गाव खेड्याचा रस्ता राहिला नसून तो अवैध खदानिचा गौण खनिज घेऊन जाणारा पूल बनला आहे. आजही या पुलावरून मोटरसायकल घेऊनजाणे सुद्धा भीती वाटत आहे त्याच पुलाची क्षमता नसल्यावरही त्या पुलावरून बेधडकदहा ते  40 ते 50 टन 12 टायर ते 16 टायर पर्यंत टिप्पर क्षमतेचा कोणताही विचार न करतामालघेऊन टिप्पर चालक रस्ता पार करतात . पीडब्ल्यूडी बांधकाम विभाग झोपेची सोंग घेऊन खदानी वाल्यांकडून आडमाप पैसा वसूल करून लोडिंग चे ट्रक जाण्या येण्यास मार्ग मोकळा करून दिला आहे. आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला असा प्रकार का दिसत नाही . अदा कदाचित ओव्हरलोड गाडी चे काही नुकसान झाल्यास ड्राईव्ह करणाऱ्या ड्रायव्हरचे काय याबाबत थोडा जरी विचार करणे आवश्यक आहे.याचा अर्थ अधिकाऱ्यांना रक्कम पुरविल्याची चर्चा जनते मध्ये चालू आहे . त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने गौण खदान इकडे जाणारा रस्ता हा बंद करावा अन्यथा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास याला सर्वस्वी पीडब्ल्यूडी विभाग अकोट हे जबाबदार राहतील असे न्यू एकता चालक-मालक संघ यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post