गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर समाजवादी पक्षाचे आमरण उपोषण अखेर मागे!


 गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर समाजवादी पक्षाचे आमरण उपोषण अखेर मागे..!

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

जळगाव जामोद येथील पंचायत समिती कार्यालयासमोर समाजवादी पार्टी, महाराष्ट्रच्या वतीने दिनांक २०/०७/२०२६ रोजी पुकारण्यात आलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषद जळगाव जामोदचे नियोजन सभापती सै. नफिझ सै. शफिक यांच्या नेतृत्वाखाली धानोरा महासिद्ध येथील छोटा कब्रस्तानमधील पाणी, कंपाउंड वॉल आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.आंदोलनाची गांभीर्यता लक्षात घेऊन गटविकास अधिकारी कोरे मॅडम यांच्याकडून ग्रामपंचायत अधिकारी, धानोरा यांना निवेदनातीस मुद्यांच्या अनुषंगाने कायदेशीर व नियमानुसार त्वरीत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आंदोलक नगरपरिषद सभापती सै. नफिझ सै. शफिक यांना त्यांचे नियोजित उपोषण स्थगित करण्याबाबतचे अधिकृत लेखी पत्र देण्यात आले, त्यानंतर हे आंदोलन यशस्वीरित्या मागे घेण्यात आले.विविध विकासकामांची पूर्ततेसाठी लेखी पत्र देताना तथा उपोषण समाप्तीच्या वेळी गटविकास अधिकारी कोरे मँडम,सहाय्यक गटविकास अधिकारी वायाळ, ठाणेदार सचिन बागुल, अब्दुल जहीर, लियाकत खान यांच्यासह समाजवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाकडून मागण्या मान्युकृत करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post Next Post