जळगाव जामोद(प्रतिनिधी):
सन 2006 ते 2013 या कालावधी मधे कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील खरेदी झालेल्या जमिनी भूधारक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर पाच लक्ष रुपये इतके अनुदान मिळणार आहे त्याकरिता दिनांक 17 जुलै 2026 रोजी या विषयाची बैठक जलसंपदा सचिव अध्यक्ष असलेल्या कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली या बैठकी मधे शेतकरी बंधूना एकूण 22 कोटी 71 लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले आहे. यामध्ये धरण रेषा व बुडीत क्षेत्रातील बुलडाणाजिल्हा अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर, हाशमपूर, नावखुर्द, गौलखेड आणि गोराडा या परिसरातील ज्या शेतकरी बांधवानाच्या जमिनीची सन 2006 ते 2013 या कालावधीत शासनाने शेती खरेदी केली होती अश्या शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरच मिळणार.सदर माहिती संबधीत शेतकरी बांधवाना कळताच त्यांनी आ डॉ संजय कुटे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचे निवास स्थानी भेट घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांनी सुद्धा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून सदर महत्वपूर्ण निर्णय घेतल्या बद्दल आभार व्यक्त केले. यावेळी शेतकरी बंधुनी गिरीश महाजन साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा दिल्या आणि आनंद व्यक्त केला.
