जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची हिवरखेड येथे धावती भेट.रेल्वे संबंधीचे विषय गांभीर्याने घेण्याचे आश्वासन.२१ ते २९ पर्यंत दैनदिन दौरा असल्याची माहिती...


 जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची हिवरखेड येथे धावती भेट.रेल्वे संबंधीचे विषय गांभीर्याने घेण्याचे आश्वासन.२१ ते २९ पर्यंत दैनदिन दौरा असल्याची माहिती...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हिवरखेड येथे भर पावसात धावती भेट दिली. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अस्थिकलश चे दर्शन घेतले आणि सदाशिव संस्थान येथील प्रस्तावित नमो उद्यानाच्या जागेची पाहणी केली. येथे नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे यांच्यासह अनेक नगरसेवक व शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी, व पत्रकार बांधवांनी त्यांचे स्वागत केले.अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा तेल्हारा दौरा पार पडला. नियोजित दौऱ्यानुसार हिवरखेड नगरपरिषद मध्ये त्यांची सभा होती. परंतु पाऊस सुरू असल्यामुळे हिवरखेड गावात प्रवेश न करताच त्यांनी सदाशिव संस्थान येथे धावती भेट दिली. तेथे गावकरी, शेतकरी व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच तर्फे विविध मागण्यांची निवेदने त्यांना देण्यात आले.शेतकऱ्यांनी अकोट खंडवा ब्रॉडगेज रेल्वे कामाच्या दरम्यान रेल्वे कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो एकर शेतीत पाणी साचल्यामुळे लक्षावधी रुपयांचे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी आणि भविष्यात पाणीच साचल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे मार्गालगत सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या नाल्या बांधून मिळाव्यात जेणेकरून शेतात पाणी साचणार नाही.. आणि ज्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व हिवरखेड विकास मंच तर्फे रेल्वे संबंधी विविध 12 मागण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये प्रामुख्याने जालना खामगाव रेल्वे मार्गाचा विस्तार शेगाव तेल्हारा मार्गे हिवरखेड पर्यंत करण्यात यावा.अकोट चांदुर बाजार रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात यावे..अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेस सुरू करण्यात यावी.अकोट हिवरखेड खंडवा रेल्वे मार्गाचे काम युद्ध स्तरावर लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.हिवरखेड येथे सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा.यासह अनेक रेल्वे संबंधी महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या.निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, अर्जुन खिरोडकार, गणेश सुरजोशे केशव कोरडे, शेख जमीर, शहजाद खान, संदीप इंगळे, यांच्यासह सह अनेक पत्रकार उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांच्या निवेदनांवर गांभीर्याने पाऊले उचलण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.नमो उद्यानची जागा पाहणी करून महात्मा गांधींच्या अस्थिकलश स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले आणि उपस्थित सर्व मान्यवरांशी संवाद साधला यावेळी तहसीलदार महेश रामगुंडे, मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्यासह नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे, उपनगराध्यक्ष प्रतिभाताई येऊल, सभापती व नगरसेवक वंदनाताई वानखडे, वैशालीताई वानखडे, अनिताताई वाकोडे, प्रमिलाताई मानकर, दीपालीताई इंगळे, प्रथमेश नाठे, किरण सेदानी यांचे सह अनेक नगरसेवक,रमेश दुतोंडे, राजेश वानखडे, धनंजय गावंडे, पुरुषोत्तम दामधर, रामकृष्ण केदार,सुरेश नाठे, मोहसीन, सुभाष भगत, सुदाम राऊत यांचेसह अनेक गावकरी आणि नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी सुद्धा हजर होते.

Previous Post Next Post