जळगाव जामोद/प्रतिनिधी:
काँग्रेस विचार विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन प्रवीण डावर यांचा महाराष्ट्र दौऱ्यात आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादना करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संयुक्त बैठकीत विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला.दौऱ्याची सुरुवात २२ जुलै रोजी सायंकाळी ६.१० वाजता मुंबई विमानतळावर राष्ट्रीय अध्यक्षांच्या आगमनाने झाली आहे.त्यानंतर २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार हुसेन दलवाई होते,मुंबईतील टिळक भवन येथे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.यानंतर दुपारी ३ वाजता आझाद मैदानाजवळील मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन प्रवीण डावर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, संघटनात्मक कामकाजाबाबतही मार्गदर्शन होणार आहे.राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन व आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. अजयसिंह राजपूत यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचे श्रेय या.खासदार मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळ, खासदार हुसेन दलवाई, रामविजय बुरुंगले, अविनाश ऊमकर...जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील ,हाजी मुज्जमील साहेब, मुस्लिम नेते बाबुभाई दमदार व विजय सातव यांना दिले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले होते.
