राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
अमरावती जिल्हा धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेतील जवळपास ६० ते ७० मुला /मुलींना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, धारणी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आज उपजिल्हा रुग्णालय, धारणी येथे प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी त्यांनी उपचाराधीन असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली व उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत योग्य ती काळजी घेण्याचे कडक निर्देश दिले. त्यानंतर खासदार वानखडे यांनी थेट टिटंबा येथील आदिवासी शाळेला भेट देऊन तिथे उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी सविस्तर चर्चा केली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि गंभीर लापरवाही दाखवणाऱ्या आश्रम शाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांवर तात्काळ सखोल चौकशी लावून त्यांना निलंबित करण्याच्या स्पष्ट सूचना खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी प्रकल्प अधिकारी शुक्ला यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत व गैरव्यवहाराबाबत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी घेतला.यावेळी प्रामुख्याने राजकुमार पटेल माजी आमदार , प्रदिप शेवाळे तहसीलदार धरणी , चव्हाण साहेब ठाणेदार धारणी , सहदेव बेलकर अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिखलदरा , रोहित पटेल सभापती कृ.उ.बा.स. धारणी , पंकज मोरे नगरसेवक , राजाखान नगरसेवक , गोलू खान, कालूभाई मालवीय तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धारणी , शोएब मेमन, सौरभ लोखंडे यांच्यासह धारणी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
