हिवरखेड वनपरीक्षेत्र वनविभागाची धाडसी कारवाई,चार गुरांना दिले जीवनदान...


 हिवरखेड वनपरीक्षेत्र वनविभागाची धाडसी कारवाई,चार गुरांना दिले जीवनदान...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

हिवरखेड नजीकच्या वानक्षेत्र सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वनविभागाचे टीमने ४ गोवंशाना दिनांक २४ जुलै रोजी जीवनदान दिले, वनविभाचे कर्मचारी दक्षिण नागरतास बीट मध्ये गस्त करत असताना त्यांना चार गुरे काही इसम अवैध रित्या नेत असल्याचे आढळून आले, तत्काळ वनविभागाने कारवाई केली मात्र या दरम्यान आरोपी पसार झाले असल्याचे वनविभागाने सांगितले तसेच वनविभागाकडून आरोपीचा तपास सुरू असून मेळघाड व्याघ्र प्रकल्पाचे एस एस आंबेकर वनपरिक्षेत्र अधिकारी   व कर्मचारी गस्त करीत असताना कारवाई करण्यात आली, आरोपी विरुद्ध कलम ५२ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम २७,२९,३१,५१, नुसार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, सदरची कारवाई आर एस टोलीया  उपवनरक्षक अकोट वन्यजीवविभाग, जी, पी टेकाडे सहा वनरक्षक अकोट वन्यजीवविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस ए आंबेकर,  आर के तायडे, वनपाल नगरतास, कु प्रमिला जावरकर( वनरक्षक उत्तर नागरतास, ) कु अर्पिता कासदेकर 

(वनरक्षक दक्षिण नागरतास)

राजपाल मावस्कर (वनरक्षक वारी बीट)  यांनी केली यावेळी वनरक्षंक, वनमजूर उपस्थित होते,  या वाघ्र प्रकल्पात अपप्रवेश करणे, अवैध वनराई करणे, व गुरांची अवैध गौतस्करी  करणे बंधनकारक आहे बंधनकारक असून कोणीही सातपुड्यातील जंगलाचा भंग केल्यास कारवाईस पात्र करण्यात येईल तसेच कोणीही अवैध प्रकार करत असल्यास आढळून आल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकास संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले,

Previous Post Next Post