अतिवृष्टीचे संकट! नदी-नाल्यांना पूर; जळगाव जामोद परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू...प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा;


  अतिवृष्टीचे संकट! नदी-नाल्यांना पूर; जळगाव जामोद परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू...प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा;

जळगाव जामोद (प्रतिनिधी);

बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुक्यासह परिसरात मध्यरात्रीपासूनच जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून, नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या सर्व गावांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, कालवे तसेच जलाशयांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.जळगाव जामोद तालुक्यासह परिसरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या सर्व गावांनी पुढील काही तास विशेष दक्षता बाळगावी.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post Next Post