अर्जुन खिरोडकार/हिवरखेड....
हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेड्यापाड्यासह गावात ठाणेदार पाटील यांनी आपला चागलाच वचक निर्माण केला, मुख्य मार्गावर मुख्य ठिकाणी काही अवैध व्यावसायिक विविध प्रकारचे अवैध धंदे करीत होते, ठाणेदार सचिन पाटील रुजू होताच यांनी मात्र अवैध धंद्यावर चांगलीच लगाम लावली, आतापर्यंत त्यांनी मोठ मोठ्या कारवाया करून आपला चागलाच दबदबा कायम ठेवला, यांच्या या सिंघम स्टाईलने अवैध धंदेवाईकांचे चागलेच धाबे दणाणले.
_____________________________
गावकऱ्यांची अपेक्षा
ठाणेदार सचिन पाटील यांचा असाच दबदबा कायम राहिल किंवा हे सुद्धा कुठे तरी किंवा कोणाच्या सांगण्यावरून आपला हा रुबाब कमी करतील का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले व त्यांनी सिंघम स्टाईलने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता राजकीय वजन असणाऱ्या प्रस्थापितांचे अवैध धंदे सुरु असल्याची कुजबुज गावात सुरु असून त्यांच्यावर सुद्धा धडाकेबाज कार्यवाही करावी अशी मागणी दबक्या आवाजात होत आहे.
____________________________
जसं जशी माहिती मिळाली किंवा जिथे आम्हाला शंका आली तिथे आम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या अवैध धंदे विरुद्ध कारवाया केल्या, आणखी पुढे माहिती मिळताच कारवाई करू,
सचिन पाटील
ठाणेदार हिवरखेड
