बुऱ्हानपूर रोड परिसरातून तीन बकऱ्यांची चोरी; जळगाव जामोद पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...


 बुऱ्हानपूर रोड परिसरातून तीन बकऱ्यांची चोरी; जळगाव जामोद पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

जळगाव जामोद शहरातील बुऱ्हानपूर रोडवरील बुलडाणा अर्बन वेअरहाऊस परिसरातून अज्ञात चोरट्याने तीन बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुकेश बाळाराम बडोले (वय 46, व्यवसाय – शेती, रा. जळगाव जामोद,बुऱ्हानपूर रोड, बुलडाणा अर्बन वेअरहाऊसजवळ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध कायमी अपराध क्रमांक 483/2026 अन्वये कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही घटना दि. 24 जुलै 2026 रोजी दुपारी 3.00 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान बुरहानपूर रोडवरील बुलडाणा अर्बन वेअरहाऊस परिसरात घडली. अज्ञात चोरट्याने एक पांढऱ्या रंगाची व दोन काळ्या रंगाच्या अशा एकूण तीन बकऱ्या, अंदाजे ₹30,000 किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार संजय वेरुळकर करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील माहिती संकलित करण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.

Previous Post Next Post