सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
जलंब मध्ये शेतामध्ये पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याचा पाय घसरल्याने नदीपात्रामध्ये वाहून जाऊन मृत्यू झाला असल्याची घटना दि. 31 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ईसापुर शिवारात घडली तर या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.जलंब पो.स्टे अंतर्गत येथून जवळच असलेल्या ईसापुर ता. नांदुरा येथील शेतकरी फुलकराम जानकीराम काळे वय 45 वर्ष हे दोन दिवसापासून सतत धार पाऊस पडल्यामुळे शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांचा नदीपात्रामध्ये पाय घसरल्याने ते पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर इसम पुरामध्ये वाहून गेल्याची माहिती समजतात जलंब पोस्टेचे कर्मचारी, तलाठी व नातेवाईकांनी शोध घेतला असता गावाजवळच असलेल्या ईसापुर शिवारातील नदीपात्रामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.अशी फिर्याद अर्जुन काळे यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील देव,पोका जावेद,शिनगारे करित आहे..
