बोर्डी नदीला आलेल्या पुरामुळे पुल वाहून गेला. तीन गावांचा संपर्क तुटला..
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
गेल्या दोन दिवसापासून सततधार सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माटरगाव येथील बोर्डी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने नदीपात्रामध्ये जाण्या येण्यासाठी असलेला व 3 गावांना जोडणारा पुल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील बोर्डी नदीवर असलेला सिमेंट चा पुल वाहून गेल्याने माटरगाव खुर्द, बेलुरा, मोरगाव या तीन गावांचा जाण्या येण्यासाठीचा संपर्क तुटल्यामुळे नागरिक, विद्यार्थी यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलावरून साधे पायी सुद्धा जाने कठीण झाले आहे तसेच दुचाकी चार चाकी वाहने सुद्धा पुलावरून जाणे येणे बंद झाले आहे. तरी पुरामध्ये वाहून गेलेल्या त्या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी हि ग्रामस्थांनी केली आहे..
