कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवा- ठाणेदार सचिन पाटील...
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी
हिवरखेड पोलिस स्टेशन मध्ये दिनांक ११ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजता शांतता समितीची बैठक घेण्यात संपन्न झाली,येणाऱ्या श्रावण मासात अधिक जास्त धार्मिक उत्सव असून यामध्ये कावड यात्रा व ईद मिलाद येत्या आठवड्यात आहेत हे सन उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये गावातील शांतता समितीचे सदस्य, पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधवानी उपस्थिती दर्शुण सहभाग नोंदवला तर विविध सामाजिक बांधिलकी जोपासण्या बाबत लोकप्रतिनिधी यांनी सामूहिक विषय मांडले तसेच पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आपले विचार व्यक्त केले, हिवरखेडवासी सुद्धा प्रत्येक सण उत्सव गुण्यागोविदाने पार पाडतात अशी माहिती उपस्थित शांतता समितीचे सदस्य यांनी यावेळी दिली
