नामदार मुकुल वासनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने रंगला सोहळा...


 नामदार मुकुल वासनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने रंगला सोहळा...

जळगाव जामोद (प्रतिनिधी);

जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ बु. येथील नामदार मुकुल वासनिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ठोंबरे सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कुमारी घरडे मॅडम उपस्थित होत्या.स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशभक्तीपर घोषणा देत परिसरात स्वातंत्र्य दिनाचा संदेश पोहोचविला. त्यानंतर विद्यार्थ्यांची कवायत व संचालन घेण्यात आले.शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या संचालनाने उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची सुंदर अभिव्यक्ती झाली.या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमारी भिवटे मॅडम, राजवैद्य सर,धांडे सर आणि बावस्कर सर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे नामदार मुकुल वासनिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयातील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाने भारलेला ठरला.

Previous Post Next Post