अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथे मोठ्या उत्साहाने पहिल्या श्रावण सोमवारी कावड यात्रा काढण्यात आली, यामध्ये हजारो शिव भक्तांनी १०१ भरण्याच्या अशा तीन कावड यात्रेत सहभाग नोंदविला, गावातील श्रीरामसेना मोठे बारगण कावड, श्री महाकालेश्वर मित्र मंडळ, फत्तेपूरी संस्थान हिवरखेड अशा विविध प्रभागातील कावड यात्रेने पहिल्या श्रावण सोमवारी पवित्र नदी पात्रातील जल आणून हजेरी लावली, व या कावडयात्रेला सोनवाडी फाटा येथे विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्या वतीने पूजन करून आरंभ करण्यात आला, तसेच कावडधारी यांची गावातील सोनवाडी फाटा, पोस्ट ऑफीस बाजूला खारोनपुऱ्यातील रहिवाशी, भवानी देवी संस्थान, बारग पुरा, भारत माता चौक, चंडिका चौकात विविध ठिकाणी, बुलढाना अर्बन बॅक समोर, बसस्थानक परिसर सन्मान बँक समोर यासह विविध ठिकाणी भक्तांनसाठी चहा, पाणी, व फराळाची व्यवस्था करण्यात आली, कावड यात्रेचे भाविक महिलांनी ठीक ठिकाणी पूजा अर्चना केली तर गावातील भाविकांनसह लोकप्रतिनिधी, समाज सेवक, पत्रकार, शांतता समितीचे सदस्य,व पोलिस कर्मचारी यांनी वेळोवेळी आपली भूमिका पार पाडली,
