त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन..


 त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन.. 

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

समता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित त्रिमूर्ती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव बाजार येथे हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत 80 वा स्वातंत्र्य दिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित स्वातंत्र्याची फळे आज समस्त भारतीय नागरिक मोठ्या अभिमानाने चाखत आहेत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हजारो शहिदांना नमन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना युनिट च्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट पासून कनिष्ठ महाविद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना वाढीस लागण्यासाठी देशभक्तीपर गीत, देशभक्तीपर गीतांवरील कवायती. भारतीय स्वातंत्र्यावरील जय घोषवाक्य. देशभक्तीपर रांगोळी इत्यादी विविध उपक्रमांनी पूर्ण सप्ताहात कार्यक्रमांची मेजवानी होती.शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध वचने देण्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सार्वजनिक ठिकाणी स्त्रिया व मुलींबद्दलचा आदर तसेच इयत्ता दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियानाची शपथ सार्वजनिक रित्या देण्यात आली.वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यामुळे समूह गायनाने वंदे मातरम गीताला उजळा देण्यात आला.या सप्ताहाभर चाललेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा विद्या काटले मॅडम तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा आनंद धुंदाळे प्रा विशाखा धुंदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्य गीताने वातावरण देशभक्तीमय झाले होते. संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून देशभक्तीपर जयघोषणांनी परिसर निनादून गेला होता.कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.असे राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे कळविण्यात आले आहे.

Previous Post Next Post