अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड येथील येथील महाकालेश्वर मित्र मंडळाने चक्क ओंकारेश्वरवरून , कावड मध्ये शिवलिंगला अर्पण करण्यासाठी नर्मदा नदीपात्रातून जल आणले,ओंकारेश्वर ते हिवरखेड असा २५०, किमी अंतराचा प्रवास या भाविक भक्तांनी केला असल्याचे कावडधारी यांनी सांगितले .या मार्गावरील मोठा घाट सुद्धा भाविकांनी पार पाडला या भाविकांनी कशाची पर्वा न करता आपली भक्ती महादेवा प्रति अथाट असल्याचे यांच्या या नादातून सिंध करून दाखवले असे सुद्धा काही भक्त आपला विचार व्यक्त करून सांगत आहेत, या भाविकांन मध्ये ६०, ते ७० भाविकांनी पायी प्रवासात हजेरी लावली असल्याचे समजते तसेच या कावडधारी भाविकांन मध्ये अनेक तरुण भाविकांचा समावेश आहे, हे भाविक दिनांक १५ ऑगस्टला सोनाजी महाराजाचे सोनाळा येथे दाखल झाले तर रविवार दिनी हे दुपार पर्यंत हिवरखेड मध्ये प्रवेश करतील आणि श्रावणच्या या पहिल्या सोमवारी विशेष म्हणजे नागपंचमीच्या दिनी कावड यात्रेत सहभाग घेऊन शिवलिंगला ओंकारेश्वर नर्मदा नदी मधील जल अर्पण करतील,
