निजामोद्दीन सैय्यद विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेट पॅनल परीक्षा उत्तीर्ण...



 निजामोद्दीन सैय्यद विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेट पॅनल परीक्षा उत्तीर्ण...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव नगरीतील क्रिकेट क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली असून, निजामोद्दीन सैय्यद यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेट पॅनल अंपायर परीक्षा घवघवीत यशाने उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशामुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेट पॅनल परीक्षेच्या अनुषंगाने 13 ते 21 जुलै 2026 या कालावधीत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच विनीत कुलकर्णी सर तसेच अभिजित देशमुख सर यांनी उमेदवारांना क्रिकेटचे नियम, पंचगिरीतील बारकावे, मैदानावरील परिस्थितीचे अचूक आकलन तसेच विविध प्रात्यक्षिक बाबींचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेनंतर उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच लेखी परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांमध्ये निजामोद्दीन सैय्यद यांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्टेट पॅनल अंपायर परीक्षेत यश संपादन केले.निजामोद्दीन सैय्यद यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, क्रिकेटच्या नियमांचे सखोल ज्ञान, पंचगिरीबद्दलची आवड आणि जिद्द यांचे फलित असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. स्टेट पॅनलमध्ये स्थान मिळवल्यामुळे त्यांच्या क्रिकेट पंचगिरीच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली असून, भविष्यात उच्चस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेने वाटचाल करण्याच्या संधी अधिक व्यापक झाल्या आहेत.या निकालामुळे जळगाव शहरातील क्रिकेटपटू, पंच, क्रीडा संघटक आणि क्रीडारसिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरातून निजामोद्दीन सैय्यद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे जळगावच्या क्रिकेट क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Previous Post Next Post