प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड..२६ देशातील ३५ सहभागींमध्ये निवड, या कार्यशाळेसाठी निमंत्रित एकमेव भारतीय युवा...


 प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड..२६ देशातील ३५ सहभागींमध्ये निवड, या कार्यशाळेसाठी निमंत्रित एकमेव भारतीय युवा...

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

पळशी झाशी येथील युवा शेतकरी प्रताप गुलाबराव मारोडे यांची ओस्नाब्रुक (जर्मनी) इथे होत असलेल्या इंटरनेशनल समर स्कूल साठी निवड झाली आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रताप मारोडेना स्कॉलरशिप देऊन निमंत्रित करण्यात आले आहे. २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधी दरम्यान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इटली मधील इकॉनॉमी ऑफ फ्रांसेस्को या संस्थेद्वारा आयोजित केलेल्या या कार्यशाळेत २६ देशांमधील ३५ युवक सहभागी होणार आहेत. सामूहिकतेचे अर्थव्यवस्थेमधील महत्व हा या कार्यशाळेचा प्रमूख विषय आहे. प्रताप मारोडे यांच्या सेंद्रिय शेती, हवामान बदल, देशी बियाणे संवर्धन, देशी कापुस लागवड आणि प्रक्रिया, स्थानिक बीजोत्सव या विषयांवर ग्रामीण भागातील तरुणांसोबत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. सेंद्रिय शेती, कापूस ते कापड निर्मिती, याविषयीची मांडणी या कार्यशाळेत त्ये करतील. यासोबतच देशी कापसाला युरोपीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुद्धा या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत. २०२४ मध्ये तैवानला झालेल्या जागतिक सेंद्रिय परिषदेमध्ये सुद्धा प्रताप मारोडे सहभागी झाले होते. त्यासोबतच गेल्या वर्षी जर्मनीला झालेल्या ग्रामीण युवा कार्यशाळेत सुद्धा त्यांची निवड झाली होती.प्रताप मारोडे सध्या सेंद्रिय शेतीमध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने पिकांची लागवड करून जवळपास ३० प्रकारची पिके घेतात. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेती, देशी बियाणे या विषयांवर काम करत असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेंद्रिय शेतीचे धोरण, देशी बियाण्याचे महत्त्व, हवामान बदलाचे परिणाम याविषयी सुद्धा मांडणी करत असतात.विदर्भातील एका खेड्या गावातील शेतकऱ्याची या कार्यशाळेसाठी निवड होणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

Previous Post Next Post