हिवरखेडच्या नमो उद्यान मधील वृक्ष लागवडची चौकशी करा,हिवरखेड शिवसेनेची मागणी...


 हिवरखेडच्या नमो उद्यान मधील वृक्ष लागवडची चौकशी करा,हिवरखेड शिवसेनेची मागणी...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील सदाशिव संस्थांन वरील मोठा गाजावाजा करून नमो उद्यानचे उद्घाटन नगरपरिषदच्या वतीने करण्यात आले, परंतु लाखो रुपयांचे हे वृक्ष लागवड या उद्यानात झाले का, या वृक्षांना पाणी आहे का,? येथील बरेच वृक्ष कुठे गेले?  काही झाडे तर बकऱ्यानी खाल्ली सुद्धा असा संतापजनक प्रश्र्न  शिंदे गट शिवसेनेच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला, व जिल्हा अधिकारी मैडम यांनी या स्थळाला भेट सुद्धा दिली आहे, त्यांनी या उद्यानातील वृक्षांची पूर्णपने लागवड झाली किंवा नाही याबाबत सखोल चौकशी करून सबंधित ठेकदारावर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर केली आहे,या गंभीर बाबीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

या नमो उद्यानला शासनाकडून भरगच्च निधी देण्यात आला, शासनाचा निधी वायफळ जाता कामा नाही येथे किती वृक्ष लागवड झाली किती वृक्ष जीवंत आहेत याबाबत चौकशी करा,

रामेश्वर हागे 

(नगरसेवक शिवसेना)

याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही

Previous Post Next Post