जळगाव जामोद(प्रतिनिधी);
आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक प्रगतीमध्ये महिलाचे मोठे योगदान असणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राज्य सरकार सुद्धा विविध सकारात्मक आणि लोकाभिमूख निर्णय घेत आहे. त्यामुळे या सर्व योजनांचा फायदा घेत महिलांनी आता सक्षम बनून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी केले.२७ ऑगस्ट रोजी संत सोनाजी महाराज मंगल भवन सोनाळा येथे आयोजित महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलडाणाद्वारा संचालित कृषी समृध्दी लोक संचालित साधन केंद्र टुनकीच्या १३ व्या वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. कुटे यावेळी बोलत होते. यावेळी आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते सर्वप्रथम सावित्री मातेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. पुढे बोलतांना डॉ. कुटे म्हणले की, शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय बद्दल मार्गदर्शन करतांना गाई, म्हशी, दुग्ध व्यवसाय, कुकूटपालन, कृषी योजना सरकारच्या विविध योजना याचा काटेकोरपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्ही नियोजन करा, आम्ही तुमच्या मदतीला आहो, असे आश्वासन आ. कुटे यानी देऊन आम्ही बहिणीच्यासाठी काही कमी पडू देणार नाही, असे सांगून अपर्णा सुध्दा आपल्या अडी-अडचणीसाठी तुमच्या मदतीला असतात, असे सांगून बचतगट सक्षमिकरणसाठी बँके मार्फत काही बचत गटांना चेक वाटप करून गुणवंत बचत गट महिलांचा सत्कार आ. डॉ. कुटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय बुलडाणाच्या पुस्तकाचे विमोचनही आ. डॉ. कुटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित महिलांनी आमदार कुटे यांना राख्या बांधून रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी बुलढाणा समीर देशमुख, लेखा अधिकारी राजेश शेगोकार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष चिकटे, संचालक मंडळ अध्यक्ष सविता अंबादास गव्हाळे, अश्याताई बावस्कार, संपूर्ण संचालक मंडळ व्यवस्थापक संगीता गणेश दातार, सहयोगिनी सुरेखा सुरेश रायपुरे, लेखापाल कु. स्वाती बावणे उपजीविका सलागार अर्जुन किशनसिंग भेड्या यांच्यासह श्रीकृष्ण वडनेरकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुणवंत खोडके, अंबादास गव्हाळे, सुरेश रायपुरे, तालुक्यातील महिला बचत गट यांचेसह आरोग्य, नेत्र तपासणी, आयुर्वेद स्टॉलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता दातार यांनी तर आभार प्रदर्शन संतोष चिकटे यांनी केले.
