जळगाव जामोद(प्रतिनिधी);
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद मध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सचिन बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली.यावेळी ठाणेदार सचिन बागुल यांनी शहरातील व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत तसेच शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.या बैठकीला प्रा. सचिन हागे,समाधान दामधर ,गोपाल घाटे, नंदु दलाल, रमेश हागे, , मोहम्मद सईद रजा साहब, नईम खान, शाकीर एस. शेख, सलीम खान, बशीर खाँ उपसरपंच, शेख शब्बीर शेख समद, शेख मजीद मेंबर यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व समाजातील मान्यवर उपस्थित होते.शहरातील शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
