हिवरखेडच्या झेडपी शाळेला कोणाचे लागले ग्रहण?विद्यार्थी संख्या जास्त असून शिक्षक संख्या का कमी.शिक्षणाधिकारी यांच्यावर माजी विद्यार्थ्यांची नाराजी,


 हिवरखेडच्या झेडपी शाळेला कोणाचे लागले ग्रहण?विद्यार्थी संख्या जास्त असून शिक्षक संख्या का कमी.शिक्षणाधिकारी यांच्यावर माजी विद्यार्थ्यांची नाराजी,

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी.

हिवरखेड येथील एकेकाळी भरगच्च शिक्षक व भरगच्च विद्यार्थी संख्याने असलेली जी, प, महात्मा गांधी विद्यालय आज रोजी या शाळेला कोणाच किंवा कोणाच्या युक्तीचे ग्रहण लागले आहे असा  संतापजनक प्रश्र्न या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केला आहे, शाळेची विद्यार्थी संख्या ९५ विद्यार्थ्यांनवर येऊन पोहचली मात्र यांना शिकवणी करिता फक्त २ शिक्षक एवढ्यावर इंग्रजी शिकवण होणार का? तसेच या शिक्षकानं मध्ये सुद्धा शासनाने गोंधळ केला असल्याचे समजते येथील शिक्षक मिसाळ यांची येथे निवयुक्ती असून त्यांना येथून, अंडगाव येथे, प्रतियुक्त, करण्यात आले, त्यामुळे आणखी येथील शिक्षक संख्या कमी झाली तरीही मात्र शाळेचे मुख्याध्यापक व २ ते ४ शिक्षकांनी शाळेची कमान कसून हाती धरली यावर्षी चागलाच निकाल मागे टाकला विद्यार्थांना चांगले शिक्षण व विशेष म्हणजे रिटेल व हेल्थ केअरची सुद्धा या शाळेत शिक्षण दिले जाते, आणि १२ वी कॉलेजचा तर येथे १०० ०/० निकाल लागला होता,मात्र अधिक ऊंच शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकते जर यामध्ये शिक्षण अधिकारी अकोला यांनी शिक्षकांची संख्या वाढवली तर हे पण होऊ शकते,मात्र ह्या शाळा बंद पडाव्या याकरिता तर नाही ना काही वरिष्ठांचे पलायन या विशेष बाबीकडे जिल्हा अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी लक्ष देऊन या जि, प , शाळेची ही समस्या सोडवावी,


जी, प शाळा वाचविणे म्हणजे फक्त शाळा नसून ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थांचा हक्क वाचविणे होत, शासनाने त्वरित लक्ष घालून जी प शाळेत शिक्षकांची भरती करावी अन्यथाआम्ही माजी विद्यार्थी आंदोलन करू,

निवृत्ती तायडे 

माजी विद्यार्थी हिवरखेड 

_____________________________

मी जेव्हा पासून प्रभारी मुख्याध्यापकांचा चार्ज हाती घेतला तेव्हा पासून आतापर्यंत मी शिक्षण अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला आम्हाला शिक्षण द्या म्हणून परंतु अजूनही पत्ताच नाही, त्यामुळे विद्यार्थी संख्या सुद्धा कमी होत चालली,.

सैयद कमरअली 

प्रभारी मुख्याध्यापक 

(जी, प शाळा हिवरखेड)

_____________________________

जी, प, शाळा बंद करुन खाजगी शाळांना मोठे करावे अशी युक्ती तर काही लोकांची नाही ना असा सुद्धा प्रश्नन आम्हाला बऱ्याचदा पडतो,येथे गोर गरिबांचे मूल शिक्षण घेतात, महागड्या शाळांच्या महागड्या फी कोण भरणार,

शहजाद खान 

(सामाजिक कार्यकर्ते हिवरखेड)

Previous Post Next Post