हिवरखेडच्या गिर्हे कमान जवळ मोटरसायकलची सिमेंट पाईपला धडक..एक जखमी...


 हिवरखेडच्या गिर्हे कमान जवळ मोटरसायकलची सिमेंट पाईपला धडक..एक जखमी...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी... 

हिवरखेड तेल्हारा रोडवर  दिनांक ६ ऑगस्टच्या दुपारी  मोटरसायकल वॉटर सर्व्हिस सेंटर जवळ तेल्हारा हिवरखेड या मार्गावर रोडच्या बाजूला असलेल्या मोठ्या  सिमेंट पाईपला मोटरसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने जबर धडक बसली, प्रवाशी कृष्णा कासदेकर रा भेली हा जखमी झाला असून पुढील उपचार घेण्यासाठी उपस्थित नागरिकांनी प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,घटनास्थळी पोलिस कर्मचारी रोहन कांबळे यांनी धाव घेतली,प्रवाशांनी रोडच्या साइडला असलेल्या विनाकारण ठेवलेल्या मोठ्या पाईप विरुद्ध नाराजी व्यक्त केली तर प्रवाशांनी दारू पिऊन मोटरसायकल चालू नये आणि हेल्मेटचा वापर सुद्धा करायला पाहिजे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे,

Previous Post Next Post