अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड पाणी पुरवठा विभागाचे कार्य प्रगतीपथावर सुरू असून यामध्ये नगरपरिषदच्या वतीने मोठे हायम्रस लाईट लावण्यात आले तर मोठ्या प्रमाणात येथील भिंतीची रंगोटी , फोलोरिंग्, यासह विविध कामे करण्यात येत आहेत तसेच यादरम्यात स्वच्छ पाणीपुरवठा नागरिकांना मिळावा याकरिता दोन दिवस पानी पुरवठा बंद ठेवून पाणी फिल्टर व जलशुद्धीकारणाची धुणी करून स्वच्छता करण्यात आली व पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला,योग्य प्रमाणात आलम व बिलिचिग पावडरचा साठा सुद्धा उपलब्ध करण्यात आला यावेळी नगरपरिषदच्या नगराध्यक्षा सौ सुलभा दुतोंडे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा सभापती अजीज खा, संदीप इंगळे, पाणीपुरवठा कर्मचारी गणेश भारसाकळे , काजिमोद्दीन, अंकुश शिंदपुरे, यांनी यादरम्यान पाहणी करून येथील जलशुद्धीकरणाचे नीट नेटके कार्य पार पाडण्याचा प्रयत्न केला,
