जळगाव जामोद(प्रतिनिधी);
भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव जामोद शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालयांच्या परिसरात सकाळपासूनच देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते नागरिकांची उपस्थिती यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना यावेळी अभिवादन करण्यात आले.यावेळी तहसीलदार पवन पाटील,बी एस किटे नायब तहसीलदार,सत्यविजय जाधव सहाय्यक महसूल अधिकारी,विजय शिंदे मंडळ अधिकारी, गौतम वाघ ग्राम महसूल अधिकारी सुनगांव,विशाल शिंदे ग्राम महसूल अधिकारी,अनंत वटकर शिपाई,गुणवंता जाधव महसूल सेवक यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, नगर परिषद जळगाव जामोद मध्ये नगराध्यक्ष गणेश दांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सीईओ जाधव साहेब यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती जळगाव जामोद कार्यालयत बीडिओ ऐश्वर्या कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले व शहरांमध्ये इतर शासकीय कार्यालयात स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संबंधित कार्यालयांच्या परिसरात ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम पार पडले.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून संविधान, लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.जळगाव जामोद शहरात विविध ठिकाणी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहरात ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
