जळगाव जामोद(प्रतिनिधी);
देशाच्या 80 व्या स्वतंत्र दिनानिमित्त जामोद येथील जना मुक्ताई मराठी प्राथमिक शाळेत देशभक्तीच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व कृष्णाई गोशाळा ट्रस्ट, जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडावी यासाठी स्मार्ट टीव्हीचे देखील वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सक्षम महिला शेतकरी बचत गटाच्या सर्व महिला सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णाई गोशाळा ट्रस्टचे सचिव सचिन हागे होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सिताराम दलाल,संस्थेचे सचिव आर. के. भगत सर,संचालक संपतराव धुर्डे,रमेश भगत सर,गजानन फुसे,भास्कर हिस्सल,सुभाष ढगे , अनुसयाबाई राऊत,कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष नंदूभाऊ दलाल, कृष्णाई गोशाळेचे व्यवस्थापकीय सचिव सुनील ढगे, शाळेचे मुख्याध्यापक धुळे सर,तसेच धुर्डे सर, फासे सर, काळपांडे सर, तेलंग्रे सर, हांडे सर,सोनोने मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात सचिन हागे यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेमाची शिकवण देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जे सहकार्य झाले त्याबद्दल त्यांनी ट्रस्ट अध्यक्ष जयेश भाई शहा यांचे आभार मानले. तर संस्थेचे सचिव आर. के. भगत सर यांनी ट्रस्टच्या वतीने होत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धुळे यांनी केले.सूत्रसंचालन काळपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश धुर्डे यांनी केले._ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
