बुलढाणा जिल्हा(प्रतिनिधी);
मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे खामगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी काळात धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून संघटन अधिक बळकट करणे, हिंदुत्वाचे विचार, सामाजिक बांधिलकी आणि युवा शक्तीचे एकत्रीकरण करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार खामगाव विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित, समाजसेवेची तळमळ आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प घेऊन ही नवी कार्यकारिणी आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे.
--नवनियुक्त पदाधिकारी--
ऋषिकेश सुधीर पऱ्हाड — जिल्हाप्रमुख धर्मवीर युथ फाऊंडेशन,सुमित विनोद काटे — जिल्हा सचिव धर्मवीर युथ फाऊंडेशन,हर्ष संतोष महातो — जिल्हा संघटक धर्मवीर युथ फाऊंडेशन,वैभव वानखेडे — उपजिल्हाप्रमुख धर्मवीर युथ फाऊंडेशन,राहुल प्रवीण झापर्डे — तालुकाप्रमुख खामगाव,विजय कैलास सारवान — शहरप्रमुख खामगाव, रणवीर पोटे — उपशहरप्रमुख खामगाव,करण सकळकळे — उपशहरप्रमुख खामगाव,राम अमर झुराव — शहर संघटक खामगाव,सोहम रहाटोळे — शहर सोशल मीडिया प्रमुख खामगाव,गौरव खुमकर — विद्यार्थी आघाडी शहरप्रमुख खामगाव यावेळी नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. पृथ्वीराज संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य तसेच खामगाव विधानसभा मतदारसंघातील युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
