YCMOU भोपळे अभ्यासकेंद्र तर्फे बहुआयामी यशकार्ड वितरण...


 YCMOU भोपळे अभ्यासकेंद्र तर्फे बहुआयामी यशकार्ड वितरण...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ माहिती अभ्यास केंद्र सहदेवराव भोपळे कॉलेज तर्फे YCMOU प्रसारित बहुआयामी यशकार्ड वितरण करण्यात आले.कुमारी सुशांती शालिग्राम दामले बीए अंतिम वर्षाचे विद्यार्थिनीला दि. १६/०८/२०२६ रविवारी बहुआयामी यशकार्डाचे वितरण केंद्रखअध्यक्ष श्यामशील भोपळे यांच्या शुभहस्ते  करण्यात आले.विद्यार्थ्यांची अधिकृत डिजिटल ओळख पटविण्यासाठी तसेच विद्यापीठाचे कोणतेही अभ्यास केंद्रावर या बहुआयामी यशकार्डचा उपयोग होणार आहे. तथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यास हे यश कार्ड उपयोगी ठरते या प्रसंगी गुरु- शिष्य अभ्यासिकेच्या सर्व विद्यार्थिनीअभ्यास केंद्राचे  अध्यक्ष श्यामशील भोपळे, पालक शालिग्राम दामले, तसेच, प्रा. गणेश भोपळे, सनि इंगळे, प्रा. पुरुषोत्तम गाढे, प्रतिक इंगळे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.विद्यापीठातर्फे प्रसारित डिजिटल बहआयामी विद्यार्थी हिताचे यश कार्ड वितरित करणारे अकोला जिल्ह्यातील भोपळे कॉलेज माहिती अभ्यास केंद्र एकमेव अभ्यास केंद्र असल्याबाबतची माहिती संयोजक प्रतीक इंगळे यांनी उपस्थित यांना दिली..

Previous Post Next Post