चांदूरबाजार/अमरावती...
चांदूरबाजार येथील क्रीडा टीसंकुलातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शहरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन व नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सादर केले.क्रीडा संकुलातील मैदानाची अस्वच्छता, डंपिंग यार्ड व मटन मार्केटमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, मैदानावर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर व कुत्र्यांची विष्ठा, शौचालयाची दुरावस्था तसेच जिमचे साहित्य धूळ खात पडलेले असल्याच्या समस्या विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर मांडल्या.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या मागण्या व समस्या ठामपणे मांडल्या. विद्यार्थ्यांच्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार साहेबांनी स्वतः क्रीडा संकुलाला भेट देऊन मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि समस्यांची माहिती घेतली. या उपक्रमाला सुमारे २०० विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी प्रतिष्ठित नागरिक प्रवीण कुमार पवार, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. राहुल अहिर, संदीप मानमोडे सर, श्रीकांत वानखेडे सर, धीरज थोरात सर, ललित नागपूरकर, रोहन गुल्हाने, प्रतीक कोल्हे, भूषण काळे, तुषार गतफणे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा संकुल हे शहरातील खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण असून, ते स्वच्छ, सुरक्षित व खेळासाठी योग्य स्थितीत ठेवण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या एकजुटीला प्रशासनाची सकारात्मक दखल मिळाल्याने क्रीडा संकुलातील समस्या लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
