जळगाव जामोद(प्रतिनिधी);
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगाव जामोद येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाची कार्यकारिणी आज दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी गठित करण्यात आली. या कार्यकारिणीत बी.ए. भाग एक, भाग दोन आणि भाग तीनच्या गृह अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनींचा समावेश करण्यात आला.अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठित करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, प्रसिद्धीप्रमुख तसेच सदस्य अशा विविध पदांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.गृह अर्थशास्त्र विभागामार्फत वर्षभर राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, व कौशल्य विकासात्मक उपक्रम गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये एकूण ३० विद्यार्थिनींचा सहभाग होता. त्यापैकी १५ विद्यार्थिनींची अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीसाठी निवड करण्यात आली.
-कार्यकारिणी-
अध्यक्ष: रेणुका बुंदे (बी.ए. अंतिम वर्ष),उपाध्यक्ष: भाग्यश्री वाघ,सचिव: निकिता वाशीमकर,सहसचिव: श्रेया तेलंग,प्रसिद्धीप्रमुख: सानिका भालतडक तर सदस्य लक्ष्मी बोदडे, हर्षा लंगोटे, वैष्णवी चोपडे, ऋतुजा गिरे, वैष्णवी खोरगडे, निकिता गव्हाळे, कृषी खराटे, साक्षी बांबटकर, गौरी राजुरकर, प्रगती दंडे, मोनो राऊत, दिपाली डावर, उषा मुजालदार.गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका सौ. अर्चना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी गठित करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, निर्णयक्षमता आणि विविध कौशल्यांचा विकास व्हावा, तसेच गृह अर्थशास्त्र विषयाशी संबंधित विविध उपक्रम प्रभावीपणे राबविता यावेत, हा अभ्यास मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.
