अकोट–मोहाळा मार्गावर रात्री अपघात; अवेस खान यांना अकोला ओझोनमध्ये हलवले...


 अकोट–मोहाळा मार्गावर रात्री अपघात; अवेस खान यांना अकोला ओझोनमध्ये हलवले...

सय्यद शकिल/अकोट...

अकोट–मोहाळा मार्गावर ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास अपघाताची घटना घडली.अकोटहून मोहाळा येथे जात असताना अवेस खान यांचा फारच दिपूजवळ अपघात झाला.रात्री सुमारे १ वाजता रस्त्यावरून जाणाऱ्या दोन प्रवाशांच्या निदर्शनास अवेस खान अपघातग्रस्त अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अवेस खान यांना उपचारासाठी अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Previous Post Next Post