अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून धमकी; छेडछाड प्रकरणी आरोपीला अटक.जळगाव जामोद पोलिसांची कारवाई; जमील खानविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल...


 अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून धमकी; छेडछाड प्रकरणी आरोपीला अटक.जळगाव जामोद पोलिसांची कारवाई; जमील खानविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

अल्पवयीन मुलीचा मोटारसायकलने पाठलाग करून धमकी देणे, तिच्याशी अश्लील स्वरूपाचे वर्तन करणे तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जळगाव जामोद पोलिसांनी जमील खान (रा. जळगाव जामोद) याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पिडीतेच्या भावाने जळगाव जामोद पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा क्र. 577/2026, कलम 74, 75, 78, 351(3) BNS तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत पीडित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकावल्याचा आरोप आहे. तिच्याशी बोलण्यास नकार दिल्यास तिच्या भाऊ-बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.तसेच आरोपीने मोबाईलवरून पीडितेच्या वडिलांशी संपर्क साधून व्हिडिओ कॉल व फोटोसंदर्भात अनुचित मागण्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.आरोपीने पीडितेला भेटण्यासाठी बोलावून तिच्याशी अनुचित वर्तन केल्याचे तसेच कोणाला काही सांगितल्यास तिला व तिच्या भावंडांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताही आरोपीने पीडितेला एकांतात थांबवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांसह भावाला सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.घटना आरोपीचे राहते घर व जळगाव जामोद परिसरात घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे करीत आहेत.गुन्हा दाखल करण्याची कारवाई मपोउपनि स्नेहा शेडगे यांनी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे,पोलीस निरीक्षक सचिन बागुल व मपोउपनि स्नेहा शेडगे यांनी भेट दिली.अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, प्रकरणातील सर्व बाबींची कायदेशीर पद्धतीने चौकशी केली जात आहे.

Previous Post Next Post